Short multilingual poems

Màu nền
Font chữ
Font size
Chiều cao dòng

तू नायनाट कर माझा कितीही तरी
राहशील तू माझ्या मनात पावसाळी नभापरी
सावळाच रंग तुझा भिजलेल्या वाळू जैसा
सुंदर असा गंध तुझा गुलाबाच्या कळी जैसा.

आभाळ हे ढगांनी भरून जाऊदे
तुझ्या प्रेमाच्या वर्षावात मला भिजून जाऊ दे;
तुझ्या पाकळ्यांमध्ये मला हरवू दे
डोळ्यांमध्ये प्रेम तुझ्या माझ्यासाठी दिसू दे.

अचानक पाऊस पडल्यावर
काही थेब तुझ्या होठांवर पाहिले....
मी क्षणभर पाहतच राहिले
माझे मन निःशब्द झाले
तेव्हा पहिल्यांदा थेंब वहावेसे वाटले ...
त्या थेंबाया हेवा भासतो मला
कारण तुझ्या होठांचा स्पर्श लागला त्याला....

By my friend Abhijit Mandhare.

Bạn đang đọc truyện trên: Truyen2U.Pro